श्रीकांत कानडे

श्रीकांत कानडे
शांत

Thursday, April 30, 2009

मधुचंद्र

मधुचंद्र

याचसाठी याच निशेची मी वाट पहिली

समईच्या शांत आभेत, उभी तू लावण्यमूर्ति
जशी शांत देव्हार्र्यातिल, अबोल पवन आरती
राहू नको शांत अबोलशी, आज माज्ह्यापाशी
एकरूप हो या मत्त निसर्गाशी, विसरुनही लाज अशी
अधीर सरिता धावत आहे, अलिंगाया अतल सागराला
शुभ्र तडीताहि चुम्बित आहे, या अमिट कालोखाला
पागल हवाही साद घालते या कभ्भिन डोंगराला
अचल धरतिही तृप्त होते पिउन चंचल पाउस धारा
वेड्या लतिका कवतालीती या मस्तितल्या वृक्षाना
आभालाच्या दुलईत निजली चान्दनिही घेउन चंद्राला
अशीच ये तू माज्ह्यापाशी होउन पागलशी,
राहू नको शांत जशी, अबोल पावन आरती 

श्रीकांत कानडे १६ अप्रैल २००९


No comments: