श्रीकांत कानडे
शांत
Sunday, October 28, 2012
Sunday, October 16, 2011
भक्तियोग X कर्मयोग
भक्तियोग X कर्मयोग
मागीतल्याशिवाय मिळत नाही हे मलाही माहित आहे!
रडल्याशिवाय दूध मिळत नाही हे मुलालाही माहित आहे
कष्टाशिवाय भाकरी मिळत नाही हे गरीबालाही माहित आहे
मंदिराच्या आत जाउन कशाला भिक मागतोस?
तिथे पुष्कळजण जाउन आलेत
तेच आज उभे आहेत ------मंदिराच्या बाहेर
तेच आज भिक मागताहेत ------- जगापाशी
म्हणुन म्हणतो 'जगापाशी माग‘
सूर्योदय
सूर्योदय
कालरात्र सरुनी उष:काल झाला आहे.
निळसर दिशाही भगवी होणार आहे.
हाच भगवा लाल होउन मध्यान्ही तळपणार आहे.
जरी होणार संध्या आहे, तीही पळसलाल आहे.
जरी परप्रकाशित; उगवणार शीतशशि आहे.
त्यालाही मध्यान्हीचा सन्दर्भ आहे.
जीवनरंग
जीवनरंग
या कमलनयनी पाहिले, पाहिले रंग भविष्याचे
या मधुरस्मितात ऐकिले, ऐकिले गीत जीवनाचे
या मधुरगीतात ऐकिले, ऐकिले अर्थ पुर्णतेचे
हीच अर्थपूर्णता वाटली, वाटली याच जीवनाची
हीच अल्पना रेखिली, रेखिली याच जीवनाची
(अल्पना -- रांगोळी)
श्रृंगार
श्रृंगार
ही प्रीत आहे, प्रीतिचा आविष्कार आहे
'नाही' म्हणुच नकोस तू, हा मर्दाचा श्रृंगार आहे
कर उभे दंडकारणे(ये), मी तिथे पोहोचणार आहे
वणवे माझ्या सोबतीला, समुद्र मी पिणार आहे
खोद सात समुद्र तू, पाणी मी जोखणार आहे
कर उभी सशस्त्र सेना, राज्य तुझे, तुझीच आद्न्या
युद्ध मी जिंकणार आहे, स्वप्न तुझे ही आराधना
रक्त हे सांडणार आहे, वीर्य मी जोखणार आहे
ही प्रीत आहे, प्रीतिचा आविष्कार आहे
'नाही' म्हणुच नकोस तू, हा मर्दाचा श्रृंगार आहे
कुत्रा
कुत्रा
त्यांनी मला विचारल, "तू कोण आहेस?"
मी म्हणालो "अल्पबुद्धि"
ते म्हणाले "न्यूनगंडा तू पार रसातळअला गेलास"
त्यांनी मला विचारल, "तू कोण आहेस?"
मी म्हणालो "बुद्धिजीवी"
ते म्हणाले "अहंगंडा तू पार रसातळअला गेलास"
मी विचारले, "मी कोण आहे?"
ते म्हणाले, "त्याची गरज नाही"
"आमच्या मागून ये"
(जर गळ्यात साखली बांधली तर कुत्र्याला "नाव, मान आणि
रोटी" मिळते)
साधू
साधू
तो
तो मस्त
तो मस्त साधू
तो मस्त साधू झोपला
तो मस्त साधू झोपला मंदिरात
तो मस्त साधू झोपला मंदिरात भोगून
तो मस्त साधू झोपला मंदिरात भोगून सारा संसार
राणीस माझ्या
राणीस माझ्या
या सांज एकांत वेळी, तुझीच याद आली,
त्या शांत एकांत वेळी, थरथरत्या हस्त स्पर्शाची,
त्या गार सांज वेळी, नर्म रेशमी स्पर्शाची,
त्या वेड्या एकांत वेळी, कापऱ्या अधर स्पर्शाची,
या शांत एकांत वेळी, तुझीच याद आली,
त्या शांत एकांत वेळी, त्या नर्म सोनेरी कान्तीची,
त्या अशांत वादल-वेळी, मी पिन्जल्या कुंतलांची,
त्या अधीर पागल वेळी, तूझ्या हुंकार संगीताची,
त्या अपूर्ण मिलन वेळी, मिलनाच्या अतूट ओढीची,
या शांत एकांत वेळी, ऐकू तुझीच साद आली
आव्हान
आव्हान
दिलेस आव्हान तुही, या बेधुंद निसर्गाला
धावत आली तुही, तुडवित निर्झराला
मस्तीत आली तुही, उतरीत डोंगराना
नज़र देत आली तूही, या तप्त भास्कराला
गीत गात आली तुही, थांबवित् पवनाला
नेसून निळी नवलाई, स्पर्शुन गर्द वनराई
दिलेस आव्हान तुही, बेधुंद निसर्गाला,
या उंच डोंगरानी, या उद्दाम पावसानी गाठले तुलाच एकांतात
या चिंब भिजल्या तनुला या बेफाम वादळ-आने स्पर्शले तुलाच
आवेगात
या थरथरत्या अधरावरती, ही गर्दी या थेम्बांची
या शुभ्र कान्तिवरती, ही गर्दी तुषारांची
स्पर्शुन तुषाराना, उधलुन सप्तारंगाना
या शांत भास्कराने चुम्बले तुलाच एकांतात
तुझी शप्पथ
तुझी शप्पथ
शपथ तुला प्रेमाची जवळ ये तू माझ्या
तू माझीच आहेस हे माझ्या फुलपाखरा
तुझी सय न आली, अशी रात न गेली
मज जाग न आली, स्वप्नी साद न येता
आहेस दूर तू माझ्या, परी हृदयात तू माझ्या
स्वीकार तू हृदयातल्या, तुझ्या अबोल प्रेमाला
मी तुझाच आहे सजनी हा सूर्य आहे साक्षीला
अशा मृदु सांजवेळी नभी सूर्य असताना
शपथ तुला प्रेमाची जवळ ये तू माझ्या
विसरीन कसा मी तुजला, आठव आहे नजरेचा
क्षण क्षण आठवतो कण कण प्रेमाचा
कशी सांग तुला सांगू माझ्या प्रेमाची हाक
आहेत दोन शब्द याचसाठी आहेस तू माझी
राणी
राणी
पहाटेस आली बघ ती, चोरून नज़र चंद्राची
लाजुन लाल झाली बघ ती, चांदणी ही शुक्राची
पाहून चाल तिची ही, थांबली गतिही सुर्याची
मीलनास आतुर सुर्याच्या, थांबली चांदणीही शुक्राची
पहाटेस आली बघ तू, चोरून नज़र सर्वांची
हळ-ऊवार वेचली बघ तू, फूले ही प्राजक्ताची
पाहून चाल तुझीही, विसरलो लाजही मनाची
मीलनास आतुर नजरांनी, थांबवली गतीही काळ-आची
भावविश्व
भावविश्व
ने तू दूर मजसी शांत तटाकी
पूर्ण शशीच्या साथीला दवगार हिरवाळीवर (व)
सांभाळ तुझ्या उबदार मिठीत
मधुर प्रणयाच्या अतुट ओढीत
लपव तूच मजसी, नाजुक ओंजलीत (ळ)
असहाय्य जीव जसा कठोर शिम्पलित
ने तू दूर मजसी शांत तटाकी
मंद हवेच्या साथीला हळ-ऊवार लहरत्या नौकेवर
समजाव मला ओठातल्या स्पर्शातून
ममतेच्या अतिकोमल भावनानतुन
ने तू दूर मजसी या निष्ठुर नजरान्तुन
लपव तूच मजसी या निष्ठुर जगातून
संपलो जरी इथेच आण तू
आपुल्या गर्भातून सखी चांदणी
सखी चांदणी
एक चांदणी अस्तंगत होताहोताना-
लाल झाली थोडी मोठीसुद्धा झाली छोटी होताना
एक चांदणी प्रसन्न होती उगवत असताना
सांजवेळी हीणवत आली तेजोमय सुर्याला
अनभिद्न्य ती - लेवून आली तेज:पुन्जता सुर्याची
एक चांदणी अस्तंगत होताहोताना-
लाल झाली थोडी मोठीसुद्धा झाली छोटी होताना
हळूच गेली सुर्याकडे पाहून चंद्रतारा
कातरवेळी समजुन गेली तेजोमयता सुर्याची
अनभीदन्य न ती येऊन ल्याली तेज:पुन्जता सुर्याची
एक चांदणी अस्तंगत होताहोताना-
लाल झाली थोडी मोठीसुद्धा झाली छोटी होताना
अनिर्बंध भावना
अनिर्बंध भावना
अबोध वयात पेरले, मनी बीज तू प्रितीचे
हळ-ऊवार घातले मी, ख़त त्यास कल्पनेचे
अबोल नजरेतून सिंचियले, ते बीज तू प्रितीचे
अनिर्बंध भावनांचे, कुंपण मी त्यास घातले
जाणत्या वयात रुजले, मनी बीज ते प्रितीचे
विश्वास तूच दिधला, होइल वृक्ष याचा
आलो मीच जवळी म्हणुन, होशील तूच माझी
अनिर्बंध भावनांचे, कुंपण मीच तोडले
समजत्या वयात तोडले, जनी रोप तू प्रितीचे
निष्ठुर तूच झाली, तुडवले त्यास तू पायी
कोमल भावनांचे स्वप्न तू चूरगाळलेस
अनिर्बंध भावनांचे कुंपण मनास घातले
दोस्ती
दोस्ती
लक्षात ठेव एक शब्द -- दोस्ती
मनात ठेव! जतन कर! एक शब्द – दोस्ती
आठवतो आहे आज मला एका शब्दाचा भूतकाल -- दोस्ती
काही वाद; काही विवाद; काही वादविवाद, थोडी स्पर्धा पुष्कळशी
-- दोस्ती
आली आहे ताकद आज तुझ्या पंखात आकाशाशी करण्याशी -- दोस्ती
लक्षात ठेव जमिनीवर एक जण उभा आहे तुझ्याशी करण्याशी --
दोस्ती
'प्रेम!' आहेत ही अडीच अक्षरे! ज्याच्यावर उभा आहे एक शब्द –
दोस्ती
लक्षात ठेव! देण्यासाठी तुला शुभेच्छा आले आहेत
एक अक्षर, एक वेलांटी, एक काना, एक अनुस्वार एक अक्षर एक शब्द
– श्रीकांत
मित्र
मित्र
लढाई हारलास तरी चालेल युध्द जिंकायचय
युध्द जिंकायसाठी मरणाचा प्रयत्न कर
शत्रु कोण? ओळखण कठीण आहे
कारण त्यांचे चेहेरे मित्रांचे आहेत
युध्द कोणाशी आहे ते ठरव कशाशी आहे तेहि ठरव
लढाईत वेळ वाया जातो
युध्द जिंकायसाठी मरणाचा प्रयत्न कर
उदिष्ट ठरव आणि मार्गस्थ हो
प्रत्येक मार्ग तुझाच तुझ्या उदिष्टापर्यंत जातो
उदिष्टापर्यंत गेल्यावरच ते कळ-एल
उदिष्टाला जिंकायचय त्याला मित्र करू नकोस
आणि हो मित्रानाही उदिष्ट करू नकोस
उदिष्ट तुझ आहे, मार्ग तुझा आहे
युध्द जिन्कताना जो तुझ्याबरोबर आला तो मित्र
काही काळ-आपुरता किंवा पूर्ण काळ-आपुरता
श्रीकांत कानडे २० अप्रैल २००९
Subscribe to:
Comments (Atom)
