अनिर्बंध भावना
अबोध वयात पेरले, मनी बीज तू प्रितीचे
हळ-ऊवार घातले मी, ख़त त्यास कल्पनेचे
अबोल नजरेतून सिंचियले, ते बीज तू प्रितीचे
अनिर्बंध भावनांचे, कुंपण मी त्यास घातले
जाणत्या वयात रुजले, मनी बीज ते प्रितीचे
विश्वास तूच दिधला, होइल वृक्ष याचा
आलो मीच जवळी म्हणुन, होशील तूच माझी
अनिर्बंध भावनांचे, कुंपण मीच तोडले
समजत्या वयात तोडले, जनी रोप तू प्रितीचे
निष्ठुर तूच झाली, तुडवले त्यास तू पायी
कोमल भावनांचे स्वप्न तू चूरगाळलेस
अनिर्बंध भावनांचे कुंपण मनास घातले

No comments:
Post a Comment